Urfi Javed
Urfi Javed

उर्फी जावेद कडून हद्द पार.. केसात माळला गजरा अन् स्‍कर्ट ही गजऱ्याचाचं…

Published on

पुढारी ऑनलाईन : उर्फी जावेद (Urfi Javed) ही तीच्या अतरंगी फॅशनसाठी ओळखली जाते. नुकताच तीन एक व्हिडिओ अपलोड केला आहे. ज्‍यामध्ये तीने फक्‍त गजराचं घातल्‍याचं दिसून येत आहे. उर्फीने आपल्‍या केसांत गजरा माळला आहे, तर कमरेलाही गजऱ्यांच्या माळा सोडून गजऱ्याचा स्‍कर्ट केला आहे. तर वरील भाग आपल्‍या हाताने कव्हर करण्याचा प्रयत्‍न केला आहे. रमजानच्या महिण्यात या बोल्‍ड अंदाजामुळे उर्फीला नेटकऱ्यांच्या टीकेचे धनी व्हावे लागले आहे. मात्र या टीकेला भीक घालेल ती उर्फी कसली..

दरम्‍यान उर्फीने (Urfi Javed) तीला किशोरवयात आलेले धक्‍कादायक अनुभव एका मुलाखतीत सांगितले. यामध्ये तीने वयाच्या १७ व्या वर्षी घरातून पळून का जावे लागले याचा किस्‍सा सांगितला.

ती म्‍हणाली, कोणीतरी तीचे फोटो पॉर्न साइटवर अपलोड केले होते. उर्फी (Urfi Javed) म्‍हणाली, तेंव्हा मी फक्‍त १५ वर्षांची होते. मी फेसबुकवर ट्यूब टॉप परिधान केलेला फोटो अपलोड केला होता. ते सर्व फोटो कोणीतरी पॉर्न साइटवर अपलोड केले. हळूहळू सर्वांना समजले की, तीचे फोटो पॉर्न साइटवर आहेत. त्‍यानंतर मला पॉर्न स्‍टार म्‍हणून बोलवले जाउ लागले.

यावर शांत बसेल ती उर्फी (Urfi Javed) कसली ती म्‍हणाली, फोटो तर कोणीही अपलोड करू शकते. मी विचारायचे व्हिडिओ कुठे आहेत. मात्र माझे वडीलही मला पॉर्न स्‍टार म्‍हणायचे असे तीने सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Uorfi (@urf7i)

या आधीही एकदम हटके, बोल्‍ड फोटो आणि व्हिडिओ अपलोड करून उर्फीने (Urfi Javed) आपल्‍या सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे. अशा अतरंगी फॅशनमुळे तीने आज माध्यमात स्‍वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तीच्या या फॅशनवर जास्‍तवेळा टीकाचं केली जाते. मात्र दुसऱ्या वेळा ती पुन्हा अधिपेक्षाही अधिक बोल्‍ड आणि नाविण्यपूर्ण पेहेरावात अवतरीत होते. असे फोटो पाहून काहीजन तीच्यावर टीका करतात. तर काहीजण तीच्या या कलात्‍मक आणि नाविण्यपूर्ण कल्‍पनेला सकारात्‍मक दाद देतात. यामुळे उर्फीला आणखी नवीन कल्‍पना सूचायला मदत आणि प्रेरणा मिळते.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news