छत्रपती संभाजीनगर : किराडपुरा दंगल अपडेट; एकाचा मृत्यू, ७ अटकेत | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : किराडपुरा दंगल अपडेट; एकाचा मृत्यू, ७ अटकेत

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : किराडपुरा येथील राम मंदिरासमोरील दंगलीत जखमी झालेल्या एकाचा काल (गुरुवार) रात्री मृत्यू झाला. दरम्यान, ४०० ते ५०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दंगेखोरांना पकडण्यासाठी स्थापन केलेल्या पोलिस पथकांनी सातजणांना अटक केली आहे. दरम्या‍न या घटनेतील शेख मुनिरुद्दिन मोईनुद्दीन (वय 54, रा. किराडपुरा) असे मृताचे नाव आहे.

सय्यद नूर सय्यद युसुफ (वय – 27 वर्ष, धंदा – मजुरी , रा. गल्ली न. 34 , सिकंदर हॉलच्या पाठीमागे, पाशा भाई यांच्या घरात भाडेकरू), बरकत शौकत शेख (२३), शेख अतिक शेख हारून (२४, अराफात मशीद, कटकट गेट), सदाम शहा बिस्मिल्ला शहा (३३), शेख खाजा शेख रशीद (25, खासगेट), शेख सलीम शेख अजीज (25, रा. सिंदखेड राजा, बुलढाणा), शारिख खान इरफान खान (23, रजाबाजार), अशी अटक करण्यात आलेल्‍या संशयीतांची नावे आहेत.

हेही वाचा : 

Back to top button