Donald Trump Money Hash Case: पॉर्न स्टारशी संबंधित प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कारवाई होणार

पुढारी ऑनलाईन: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियल प्रकरणात तपासा अंती ट्रम्प यांच्यावर फौजदारी खटल्याअंतर्गत (Donald Trump Money Hash Case) कारवाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान ट्रम्प यांना चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. चौकशीला हजर न राहिल्यास किंवा आत्मसमर्पण न केल्यास त्यांना अटक होऊ शकते, असा निर्णय न्यूयॉर्कच्या ग्रँड ज्युरीने गुरुवारी (30 मार्च) दिला आहे.
हे प्रकरण २०१६ च्या अध्यक्षीय प्रचारादरम्यानचे आहे. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी एका पॉर्न स्टारला पैसे दिल्याबद्दल त्यांना दोषी ठरवले. अशा प्रकरणात गुन्हेगारी आरोपांना सामोरे जाणारे ते अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. ट्रम्प यांना अटक झाल्यास (Donald Trump Money Hash Case)अटक होणारे ते अमेरिकेचे पहिले माजी राष्ट्राध्यक्ष असणार आहेत.
A Manhattan grand jury’s indictment of former President Donald Trump will set in motion a criminal process that will in some ways work like that of any other defendant, and in other ways, look very different. https://t.co/en7RyXKM1F
— CNN (@CNN) March 31, 2023
हे संपूर्ण प्रकरण २०१६ मध्ये पॉर्न स्टार स्टॉर्मी डेनियलला एक लाख तीस हजार डॉलर्स देण्याच्या चौकशीशी संबंधित आहे. ज्यामध्ये ट्रम्प यांना आरोपी मानण्यात आले आहे. ग्रँड ज्युरी तपासात असे आढळून आले की, २०१६ मध्ये पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियलने मीडियासमोर खुलासा केला होता. तिने २००६ मध्ये ट्रम्पसोबत अफेअर असल्याचे स्पष्ट केले होते. हे स्पष्ट केल्यानंतर ट्रम्प यांच्या वकिलाने पॉर्न स्टार स्टॉर्मीला शांत राहण्यासाठी १ लाख ३०,००० डॉलर इतकी रक्कम दिली असल्याचे तपासात समोर आले आहे.
Donald Trump Money Hash Case: हे राजकीय षडयंत्र-डोनाल्ड ट्रम्प
स्टॉर्मीला पैसे देणे बेकायदेशीर नव्हते. परंतु ज्या पद्धतीने ट्रम्प यांच्या वकिलाने गुपचूप स्टॉर्मीला पैसे दिल्याने ते बेकायदेशीर मानले जात होते. ही रक्कम चुकीच्या पद्धतीने देण्यात आल्याचा आरोप अमेरिकेतील संबंधित तपास यंत्रणेने केला आहे. अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प यांच्या वकिलाने हा केलेला व्यवहार गुन्हा मानला जात आहे. ज्याची चौकशी ट्रम्प अध्यक्ष असताना सुरू झाली होती. अमेरिकेतील निवडणूक कायद्याचे उल्लंघन म्हणूनही या प्रकरणाकडे पाहिले जात आहे. तर ट्रम्प हे आपल्याविरुद्धचे मोठे राजकीय षडयंत्र असल्याचे म्हणत आहेत.
ट्रम्प यांच्यावर आणखी तीन गुन्हे
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी वकील मायकेल कोहेन यांनी या प्रकरणात २०१९ मध्ये ग्रँड ज्युरीसमोर साक्ष दिली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, ट्रम्पच्या वतीने डॅनियल्सला पैसे दिले गेले होते, जे नंतर निवडणूक प्रचार खर्चात दाखवले गेले. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांची आणखी तीन आरोपांखाली सध्या चौकशी सुरू आहे. याप्रकरणातील त्यांची पहिलीच चौकशी असून, त्यावर निर्णय होणार आहे. ट्रम्प यांच्यावर २०२० च्या यूएस निवडणुकीशी संबंधित जॉर्जियामध्ये आणि ६ जानेवारी २०२१ रोजी वॉशिंग्टनमधील हल्ल्याप्रकरणी आरोप आहे, ट्रम्प यांची ही चौकशी देखील सुरू आहे.