मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरण : आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला | पुढारी

मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरण : आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबई; पुढारी ऑनलाईन

मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला गेला आहे. आज शुक्रवारी त्याला जामीन मंजूर झाला नाही. आता त्याच्या वकिलाला जामिनासाठी सत्र न्यायालयात जावे लागेल.

आर्यनचे वकील सतीश मानशिंदे यांनी न्यायालयाला सांगितले की, जामीन देण्याचा अधिकार मॅजिस्ट्रेट न्यायालयाला आहे. मानशिंदे म्हणाले की, जर कोर्टाला रिमांड देण्याचे अधिकार असतील, तर जामीन देण्याचे अधिकारही न्यायालयाच्या अधिकारांमध्ये निहित आहेत. आर्यनच्या वतीने मानशिंदे म्हणाले की, माझ्याजवळ किंवा माझ्या बॅगमध्ये कोणतेही साहित्य सापडले नाही. कोणतेही षड्यंत्र उघड करण्यासाठी एकही साहित्य नाही.

कॉर्डेलिया क्रूझमध्ये आयोजित ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटक करण्यात आलेला बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ आरोपींना राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) गुरुवारी दुपारी न्यायालयासमोर हजर केले.

दोन्ही पक्षांमध्ये तीन तासांहून अधिक काळ चाललेल्या युक्तिवादानंतर न्यायालयाने आठही आरोपींना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या आरोपींच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

एनसीबीच्या पथकाने शनिवारी 2 ऑक्टोबरच्या रात्री कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारी करून आर्यन खान याच्यासह त्याचा मित्र अरबाज मर्चंट, मुनमुन धमिचा, नुपूर सारिका, इश्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा अशा आठ जणांना काही प्रमाणातील ड्रग्ज आणि रोख रकमेसह ताब्यात घेत चौकशी सुरू केली. एनसीबीने याप्रकरणी गुन्हा दाखल करून 3 ऑक्टोबरच्या दुपारी आर्यन याच्यासह अरबाज आणि मुनमुन हिला अटक केली.

हे ही वाचलं का?

Back to top button