छत्रपती संभाजीनगरमध्ये शांतता; स्वार्थासाठी राजकीय वक्तव्य करू नयेत : देवेंद्र फडणवीस | पुढारी

छत्रपती संभाजीनगरमध्ये शांतता; स्वार्थासाठी राजकीय वक्तव्य करू नयेत : देवेंद्र फडणवीस

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्रपती संभाजीनगरला घडलेली घटना दुर्देवी आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून शांतता राहावी यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. परंतु काही नेते जाणीवपूर्वक परिस्थिती चिघळण्यासारखी राजकीय वक्तव्य करत आहेत. स्वत:च्या स्वार्थासाठी सुरू असलेला हा प्रयत्न तात्काळ बंद करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

छत्रपती संभाजीनगरममध्ये बुधवारी रात्री दोन गटात राडा झाला. यावेळी दगडफेक आणि जाळपोळ झाली. पोलिसांच्या वाहनांसह अनेक खासगी गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. यानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी  शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. काही लोकांचा प्रयत्न त्या ठिकाणची परिस्थिती चिघळण्यासारखी वक्तव्य करण्याचा आहे. अशा परिस्थितीत नेत्यांनी कसे वागावे हे समजून घेतले पाहिजे. सगळ्यांनी शांतता पाळावी. चुकीची वक्तव्य देवू नयेत. राजकीय रंग देण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्यासारखं दुर्देवी काहीच नाही. शांतता राहावी यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. काही नेते जाणीवपूर्वक राजकीय वक्तव्य देवून तेथील परिस्थीती बिघडली पाहिजे, असा स्वत:च्या स्वार्थासाठी प्रयत्न करत आहेत. तो तात्काळ बंद करावा, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे.

हेही वाचा : 

Back to top button