बीड : निलेश राणे केज कोर्टात हजर; प्रकाश आंबेडकरांवर केली होती आक्षेपार्ह पोस्ट | पुढारी

बीड : निलेश राणे केज कोर्टात हजर; प्रकाश आंबेडकरांवर केली होती आक्षेपार्ह पोस्ट

गौतम बचुटे; केज : माजी खासदार निलेश राणे आज (दि.२९) बीडच्या केज न्यायालयात हजर झाले. वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी २०२० मध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

२०२० मध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या विरुद्ध माजी खासदार निलेश राणे यांच्यासह केज तालुक्यातील विवेक अंबाड, रा. लाडेगाव व रोहन चव्हाण रा. पळसखेडा यांनी अपशब्द वापरून दोन समाजामध्ये व्देषभाव निर्माण होईल अशा पोस्ट सोशल मिडियावर शेअर केल्या होत्या. याप्रकरणी केज तालुका वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब मस्के यांनी केज पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती. यानुसार निलेश राणे, विवेक अंबाड, आणि विवेक चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे यांनी तपास करून दोषारोप न्यायालयात पाठविले होते. त्यानंतर आज राणे हे न्यायाधीश पावसकर यांच्या न्यायालयात हजर झाले होते.

हेही वाचा :

 

Back to top button