लातूर : औसा- निलंगा मार्गावर भीषण अपघात, कार पुलावरून कोसळली, एकाच कुटुंबातील चौघे ठार | पुढारी

लातूर : औसा- निलंगा मार्गावर भीषण अपघात, कार पुलावरून कोसळली, एकाच कुटुंबातील चौघे ठार

लातूर, पुढारी वृत्तसेवा : नातेवाईकाचे लग्न आटोपून कारने पुण्याहून निलंग्याकडे निघालेले एकाच कुटुंबातील चोघे कार उलटल्याने जागीच ठार तर चोघे जखमी झाले आहेत. सोमवारी सकाळी औसा- निलंगा मार्गावरील चलबुर्गा पाटी जवळ हा भीषण अपघात अपघात झाला. जय सचिन बडुरकर, अंश किरण बडुरकर, अमर सचिन बडुरकर आणि प्रकाश कांबळे अशी या अपघातात मरण पावलेल्यांची नावे आहेत.

जखमींवर औसा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यश किरण बडुरकर, जान्हवी सचिन बडुरकर, गोदावरी सचिन बडूरकर, सचिन दिगंबर बडूरकर अशी जखमींची नावे आहेत. कार वेगात होती. चलबुर्गा पाटीजवळ पुलानाजिक ती आली असता चालकाचे नियंत्रण सुटले व कार पुलावरून खाली कोसळली.

हे ही वाचा :

Back to top button