अक्कलकोट : वागदरीच्या ग्रामदैवत यात्रेत रथाचे चाक निसटल्याने मोठा अपघात; दोन भाविकांचा मृत्यू | पुढारी

अक्कलकोट : वागदरीच्या ग्रामदैवत यात्रेत रथाचे चाक निसटल्याने मोठा अपघात; दोन भाविकांचा मृत्यू

अक्कलकोट; पुढारी वृत्तसेवा : अक्कलकोट शहरापासून वागदरी येथील ग्रामदैवत परमेश्वर यात्रा उत्सव काळात मोठी दुर्घटना घडली. ठेर (रथ) ओढणे या धार्मिक कार्यक्रमामध्ये अचानकपणे रथाच्या चाकाचा पार तिसटल्याने ही दोन भाविकांचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी (दि. २६) सुर्यास्ताच्या दरम्यान घडल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, वागदरी येथील ग्रामदैवत परमेश्वर यात्रा मोठ्या उत्साहात सुरु होती. मोठ्या प्रमाणात सीमावर्ती भागातून भाविक यात्रेकरिता जमले होते. यात्रेतील मुख्य घटक रथ ओढणे परमेश्वर मंदिर ते बसस्थानक भागापर्यंत असंख्य भाविक रथ ओढतात. सुमारे १२ फुट रुंदी असलेल्या रथाचे गोलाकार दगडी चाक आहेत. रथ ओढणे हा धार्मिक विधीवेळी परमेश्वर महाराज की जय…! अशी घोषणा देतात व रथावर खारीक प्रासादिक वस्तूंचे उधळण करतात. यंदा सूर्यास्ताच्या दरम्यान हा रथ ओढत असताना अचानकपणे ही दुर्दैवी घटना घडल्याने मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या पैकी संजय नंदे, गंगाराम गाडीवर हे भक्त गंभीर जखमी झाले. उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. या घटनेनंतर वागदरी येथील परमेश्वर यात्रा उत्सवातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.

Back to top button