हिंगोली : केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन | पुढारी

हिंगोली : केंद्र सरकार विरोधात काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याच्या निषेधार्थ हिंगोली जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आज (दि.२६) महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर ‘सत्याग्रह आंदोलन’ करण्यात आले. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सकाळी अकरा वाजता जिल्हा काँग्रेसच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन सत्याग्रह आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. यावेळी माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर म्हणाले की, राहुल गांधी यांची सध्या देशभरात लोकप्रियता वाढत असल्यामुळे सरकार त्यांच्यावर सूड उगवत आहे. मोदी सरकारच्या हुकुमशाही विरोधात काँग्रेसचा लढा अधिक तिव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला. जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई यांनी मोदी सरकारवर टीका करताना पुढील काळात हिंगोली जिल्ह्यात आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार विरोधातील आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचे सांगितले.

आंदोलनात जिल्हा कार्याध्यक्ष मुनिर पटेल यांच्यासह जि.प.सदस्य डॉ. सतिश पाचपुते, माजी सभापती भैय्या देशमुख, केशवराव नाईक, रणजीत पाटील गोरेगावकर, विलास गोरे, तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण, भास्करराव बेंगाळ, बापुराव पाटील, राजाराम खराटे, पंकज जाधव, अजगर पटेल, अज्जु ईनामदार, पुष्पक देशमुख, अभय पाटील सावंत, नंदकिशोर कदम, द्वारकादास सारडा, कांतराव हराळ, बाजीराव जूमडे, उत्तमराव आसोले, बालाजी गांवडे, खूशालराव हराळ, रेहमान भाई, मूस्साभाई, नथूजी पाटील, समीर भिसे, भगवान खंदारे, गजानन ढाकरे, भोलासिंग दरोगा, श्रिनिवास मुंढे, सुधिर राठोड, देविदास ससाने, केशव मस्के, सखाराम अडकिणे आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button