औरंगाबाद : केकत जळगाव येथे घरगुती भांडणातून ४५ वर्षीय महिलेचा खून | पुढारी

औरंगाबाद : केकत जळगाव येथे घरगुती भांडणातून ४५ वर्षीय महिलेचा खून

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या केकत जळगाव येथे ४५ वर्षीय महिलेचा घरगुती भांडणावरून खून केल्याची घटना बुधवारी (दि.२२) घडली. या प्रकरणी पती शहादेव बढे व अल्पवयीन मुलाला अधिक चौकशीसाठी पाचोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खून झालेल्या महिलेचे नाव राधाबाई शहादेव बढे असे आहे.

पाचोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केकत जळगाव येथे बुधवारी (दि.२२) रोजी राधाबाई शहादेव बढे महिलेचा राहत्या घरी खून करण्यात आल्याची माहिती सपोनि जनाबाई सांगळे यांना मिळाताच त्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय अहवालासाठी पाचोड येथील शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी मयत महिलेचे पती शहादेव बढे व एका अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आले.

हेही वाचा;

Back to top button