'पुढारी इफेक्ट' : अखेर नाफेड हरभरा खरेदीस आज मुहूर्त लागणार | पुढारी

'पुढारी इफेक्ट' : अखेर नाफेड हरभरा खरेदीस आज मुहूर्त लागणार

जवळा बाजार (हिंगोली) : पुढारी वृत्तसेवा – येथील बाजार समिती परिसरात नाफेडकडून खरेदी-विक्री केंद्रावर आज हरभरा खरेदीस, सुरूवात होणार आहे. दि. १६ मार्च रोजी ‘दैनिक पुढारी’त नाफेडकडून हरभरा खरेदीस बारदाना अभावी मुहूर्त लागेना बातमी प्रसिद्ध होताच तात्काळ बातमी दखल घेऊन नाफेडकडून आज दिनांक १७ मार्च रोजी  हरभरा खरेदीस सुरूवात करण्यात येणार, अशी माहीती खरेदी विक्री संघाकडून देण्यात आली आहे.

राज्यात शासनाचे हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी नाफेडकडून विलंबाने ऑनलाइन नोंदणीस सुरुवात केली. पण दिनांक १४ मार्चपासून नाफेडकडून हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचे खरेदी विक्री संघास लेखी आदेश दिले. नाफेडकडून मागील दोन दिवसापासून हरभरा खरेदी केंद्रावर नाफेडच्या बारदानाअभावी खरेदी केंद्र येथील सुरू झाले नाही.

राज्यात शेतकरी बांधवांचा रब्बी हंगामातील उत्पादित हरभरा ऑनलाइन नोंदणी करण्यास मोठ्या प्रमाणात विलंब लावला. यामुळे शेतकरी बांधवांना शासनाच्या हमीभावापेक्षा जवळपास एक हजार रुपये क्विंटल मागे कमीने बाजारात आडत बाजारपेठेत हरभरा विक्री करावा लागत आहे. नाफेडकडून खरेदी केंद्र सुरू व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांनी मागणी केली आणि या मागणीस विलंबाने २७ फेब्रुवारीपासून ऑनलाईन हरभरा नोंदणीस सुरुवात केली. पण विविध कागदपत्राच्या त्रुटी अभावी मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांनी नोंदणीसाठी विलंब लागला आहे. त्यातच १४ मार्चपासून हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्याचे नाफेडकडून जाहीर करण्यात आले होते.

औंढा नागनाथ तालुका खरेदी विक्रीसंघ अंतर्गत जवळाबाजार येथे हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी मागील दोन दिवसापासून खरेदी केंद्र सुरू करण्याचे उद्घाटन नाफेडकडून बारदाण्याचा पुरवठा न केल्यामुळे सुरुवात झालेली नाही. खरेदी विक्री संघाकडून नाफेड विभागास बारदाना तात्काळ पुरवठा करावा, अशी मागणी केलेली आहे.  दिनांक १७ मार्च रोजी अखेर नाफेडकडून हरभरा खरेदीस मुहूर्त लागले आहे.

Back to top button