परभणी : सोनपेठ- परळी राष्ट्रीय महामार्गावर कार-ऑटोरिक्षाची धडक; बारा जखमी | पुढारी

परभणी : सोनपेठ- परळी राष्ट्रीय महामार्गावर कार-ऑटोरिक्षाची धडक; बारा जखमी

सोनपेठ; पुढारी वृत्तसेवा : सोनपेठ- परळी राष्ट्रीय महामार्गावर कार व ऑटो रिक्षाची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात बारा जण जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि.१३) घडली. जखमींना सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले.

सोनपेठ येथून शालेय विद्यार्थी व नागरिकांना घेवून ऑटोरिक्षा (MH 44 A 2716) डिघोळकडे जात होती. खपाट पिंपरी शिवार येथे आले असता त्याचवेळी परळी येथून येणारी मारुती अल्टो कार (MH 22 U 3498) ची समोरासमोर धडक झाली. यात प्रदीप करडभुजे (वय 45), पंकज महाजन (वय 43), संगीता महाजन (वय 35), चैतन्य महाजन (वय 10), कुणाल शिंदे (वय 16), लक्ष्मण हजारे (वय 35), ऋतुजा रांजणे (वय 16), शिवकन्या गिरे (वय 16), आर्यन करडभुजे (वय 10), आराध्या करडभुजे (वय 3), प्राची करडभुजे (वय 30) व आदित्य रत्नपारखे (वय 16) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना सोनपेठ येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. तर काहींना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक अमर केंद्रे, दिलिप निलपत्रेवाड, विनोद कुलकर्णी, श्रीकृष्ण तिडके यांनी भेट दिली. या प्रकरणी सोमवारी रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हेही वाचा : 

Back to top button