छत्रपती संभाजीनगर : गोदावरी नदीत बुडून चार तरुणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर : गोदावरी नदीत बुडून चार तरुणांचा मृत्यू

गंगापूर, पुढारी वृत्तसेवा : कायगाव टोके येथे सिध्देश्वर मंदिराजवळील गोदावरी नदीत चार तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (दि.११) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली. बाबासाहेब अशोक गोरे (वय 35), नागेश दिलीप गोरे (वय 20), अक्षय भागिनाथ गोरे (वय 20), शंकर पारसनाथ घोडके (वय 22, सर्व रा. पालखेड, ता. वैजापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील पालखेड येथील चार तरूण पाथर्डी तालुक्यातील मढी येथील कानिफनाथ यात्रेसाठी निघाले होते. रस्त्यामध्ये सिद्धेश्वर मंदिराचे दर्शन घेऊ नदीमध्ये स्नान करून जाऊ म्हणून ते सिद्धेश्वर मंदिराच्या घाटावरती आले. तेथे स्नान करत असताना त्यांचा गोदावरी नदी बुडून मृत्यू झाला.

तब्बल दोन तास मृतदेह शोधण्यासाठी मोहीम राबवली. त्यानंतर शंकर पारसनाथ घोडके याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर तिघांचे मृतदेह शोधून काढण्यात आले. चारही मृतदेह नेवासा येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news