छत्रपती संभाजीनगर : अवकाळी पावसाने मोठे नुकसान; आडव्या गव्हाच्या पिकावर शेतकऱ्याचा टाहो (व्हिडिओ)

छत्रपती संभाजीनगर : अवकाळी पावसाने मोठे नुकसान; आडव्या गव्हाच्या पिकावर शेतकऱ्याचा टाहो (व्हिडिओ)

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात एकीकडे होळी – धुळवडीचा उत्साह सुरु असताना दुसरीकडे संपूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोमवारी संध्याकाळपासूनच छत्रपती संभाजीनगर, गंगापूर, वैजापूर, कन्नड, सोयगाव,सिल्लोड,पैठण, फुलंब्री, या तालुक्यातील अनेक भागांमध्ये ठिक – ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला.तर काही ठिकाणी गारांचा वर्षाव ही झाला. त्यामुळे गहू हरभरा कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढणीला आलेला गहू भुईसपाट झाल्याने शेतकरी हातबल झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात २ दिवसा पासुन अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. एकीकडे कांद्याचे भाव गडगडले असताना दुसरीकडे या पावसामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. ढगांचा गडगडाट, विजांच्या लखलखाटात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या विविध भागात पावसाचा तडाखा बसला. जोरदार सुटलेल्या वाऱ्यामुळे शेतात उभे पिक भुईसपाट झाले असून गहू, हरबरा पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आता या शेतकऱ्यांसाठी प्रशासन काय पाऊल उचलते? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान झालेल्या शिल्लेगाव सर्कल मधील वजनापुर येथील शेतकऱ्याने पावसामुळे झोपी गेलेल्या गव्हाच्या शेतामध्ये झोपून बोंबाबोंब आंदोलन केले.

 हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news