पुणे: लोहगावात 6 इमारती जमीनदोस्त, डी. वाय. पाटील कॉलेज रस्ता परिसरात महापालिकेची कारवाई | पुढारी

पुणे: लोहगावात 6 इमारती जमीनदोस्त, डी. वाय. पाटील कॉलेज रस्ता परिसरात महापालिकेची कारवाई

येरवडा (पुणे), पुढारी वृत्तसेवा: लोहगाव येथील डी. वाय. पाटील कॉलेज रस्ता परिसरात कृषी झोनमध्ये सुरू असलेली अनधिकृत बांधकामे महापालिकेने शुक्रवारी जमीनदोस्त केली. या वेळी एकूण सहा इमारती पाडत सुमारे 17 हजार 200 चौरस फूट क्षेत्रावरील बांधकामांवर कारवाई केल्याची माहिती बांधकाम विभागाचे उपअभियंता हनुमान खलाटे यांनी दिली.

महापालिका प्रशासनाने कारवाई करण्यापूर्वी संबंधित बांधकामांच्या मालकांना नोटीस बजाविल्या होत्या. मात्र, त्यांच्याकडून या नोटिसांना प्रतिसाद देण्यात न आल्यामुळे सहा इमारतींचे अनधिकृत आरसीसी बाधकाम पाडण्यात आले. एक जॉ कटर, दोन ब्रेकर, दोन जेसीबी, दोन गॅस कटर, १० बिगारी आदींच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजित सुर्वे, उपअभियंता हनुमान खलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता प्रतिक पाथरकर, संदीप धोत्रे, प्रकाश कुंभार यांच्यासह अतिक्रमण विभागाचे पोलिस निरीक्षक राजू अडागळे यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. परिसरातील नागरिकांनी रीतसर परवानगी घेऊन बांधकाम करावे. तसेच यापुढे देखील अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच रहाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Back to top button