वाशिम : हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा; या मागणीसाठी बसपाचा मोर्चा

वाशिम : हत्या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करा; या मागणीसाठी बसपाचा मोर्चा

वाशीम; पुढारी वृत्तसेवा : मालेगाव तालुक्यातील बोराळा येथील उपसरपंच विश्वास कांबळे यांचा दि. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडात सामील असणाऱ्या आरोपींना अटक करून तात्काळ शिक्षा करण्यासाठी जलदगती कोर्टात केस दाखल करावी, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना ५० लाखांची मदत करावी, या मागणीसाठी बहुजन समाज पार्टी वाशीम जिल्ह्याच्या वतीने गुरूवारी (दि.९ मार्च ) रोजी दुपारी २:०० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चाला सुरूवात करण्यात आली.

सदर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी बसपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अॅड. संदीप ताजने, बसपा महाराष्ट्र कर्यकारणी सदस्य अविनाश वानखेडे, बसपा जिल्हाध्यक्ष बबनराव बनसोड, दे. वा. इंगळे हे उपस्थित होते. सदर मोर्चाला मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी झाले होते.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news