बेळगावात जागृतीमुळे सुधारले महिला-पुरुषांचे प्रमाण; प्रादेशिक आयुक्त हिरेेमठ यांचा दावा | पुढारी

बेळगावात जागृतीमुळे सुधारले महिला-पुरुषांचे प्रमाण; प्रादेशिक आयुक्त हिरेेमठ यांचा दावा

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, सुकन्या समृद्धी योजना आदी उपक्रमांमुळे बेळगावचे महिला-पुरुष गुणोत्तर सुधारले आहे. ग्रामीण भागात मुलींच्या शिक्षणाला महत्व देण्यात आले आणि डॉक्टरांना कायद्याबाबत मार्गदर्शन केल्याने चांगला फायदा झाला, असे मत प्रादेशिक आयुक्त एम. जी. हिरेमठ यांनी व्यक्त केले.

बेळगावचे लिंग गुणोत्तर 962 असल्याचे सांगण्यात आले. मुलगी वाचवा, मुलीला शिक्षित करा, गर्भधारणापूर्व आणि गर्भलिंग चाचणी प्रतिबंध कायदा या विषयावर विभागस्तरीय कार्यशाळा शुक्रवारी पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन करून प्रादेशिक आयुक्त हिरेमठ यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, डॉक्टरांनी गर्भलिंग कायद्याबाबत माहिती घ्यावी. व्यवसायाशी तडजोड करू नये. अन्यथा कठोर कारवाई होईल. डॉ. विवेक दोराई यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी, डॉ. इरण्णा पल्लेद, शिल्पा गोदीगौडी, डॉ. बी. एन. तुक्कार, बी. पी. यलिगार आदी उपस्थित होते.

Back to top button