

राष्ट्रीय महामार्गावरील रांजणी जवळ एका नाल्यात मानवी सांगाडा आढळल्याने खळबळ उडाली होती. गेवराई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा सांगडा महिलेचा असल्याचा अंदाज गेवराई पोलिसांनी वर्तविला. गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर ही घटनास्थळी दाखल झाले होते.
राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या रांजणी गावाजवळ रस्त्यालगतच्या नाल्यात मानवी सांगडा आढळून आल्यानंतर गेवराई पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
साधारण आठ ते दहा दिवसांपूर्वी महिलेचा खून करून मृतदेह या ठिकाणी लपविण्यात आला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
याबाद सविस्तर माहिती अशी कि, महामार्गालगत असना -या नालीत एका मृत महिलेचा सांगाडा आढळून आला होता.
हा सांगडा महिलेचा आहे असा अंदाज गेवराई पोलिसांनी वर्तविला होता, तो अखेर खरा ठरला असून, या महिलेची ओळख पटली आहे.
राधा माणिक गायकवाड ( वय ३४ , रा. ता. इंदेवादी जि.जालना) असे या महिलेचे नाव आहे.
जालना तालुका पोलिस ठाण्यात ही महिला बेपत्ता असल्याची नोंद होती.
यावरून गेवराई पोलिसांनी जालना पोलिस यांना संपर्क साधला व नातेवाईक गेवराई उपजिल्हा रूग्णयात आले.
नातेवाईकांनी तिची साडी, कानातले, पैजन दागिन्यांवरून ओळख पटवली.
जमादार शेळके, पो. ना. अमोल खटाने यांनी पंचनामा केला .
या प्रकणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप काळे करीत आहेत.