हिंगोली: कापसाने भरलेली गाडी चोरट्यांनी पळवली | पुढारी

हिंगोली: कापसाने भरलेली गाडी चोरट्यांनी पळवली

सेनगाव: पुढारी वृत्तसेवा: सेनगाव तालुक्यातील साखरा येथील पेट्रोलपंपावर सुमारे 27 क्विंटल कापूस भरून उभा केलेली गाडी चोरट्यांनी पळवली. आज (दि.२७) पहाटे घडलेली ही घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. सेनगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक चोरटा दिसून येत आहे. पोलिसांनी आता चोरट्याचा शोध सुरु केला आहे.

जयपूर येथील शेतकरी लक्ष्मण पायघन यांनी घरात साठवलेला सुमारे 27 क्विंटल कापूस जिंतूर येथे विक्रीसाठी नेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार त्यांनी रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पिकअप व्हॅनमध्ये कापूस भरून ते वाहन साखरा येथील पेट्रोल पंपावर उभे केले. सोमवारी सकाळी वाहन घेऊन जिंतूर येथे कापूस विक्रीसाठी ते जाणार होते. परंतु गाडी चोरून नेल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित भोईटे व उपनिरीक्षक सतीश ढेंगे घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा 

Back to top button