Aurangabad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या मनाचे नेते-कृषिमंत्री अब्दुल सत्तार | पुढारी

Aurangabad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या मनाचे नेते-कृषिमंत्री अब्दुल सत्तार

औरंगाबाद, पुढारी वृत्तसंस्था : कापूस उत्पादक शेतकरी बाबत सरकार विचार करीत असल्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी बुधवारी रात्री पत्रकारांशी बोलताना सांगितले. बुधवारी परदेश दौऱ्यावरून परतल्या नंतर साजापूर येथील एका हॉटेलच्या उदघाटनासाठी ते आले होते. ते म्हणाले, पौष्टीक आहार तयार करण्यासाठी येत्या बजेट मध्ये काही तरतूद होईल, २५ लाख हेक्टरवर नैसर्गिक शेती करण्याचे नियोजन आहे. (Aurangabad)

पक्षाचे चिन्ह भेटले, नाव भेटले. व्हीप काढले तर काय होईल. यावर कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, ठाकरे गटाला भीती होती, आम्ही व्हीप काढणार, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठ्या मनाचे नेते आहेत. सुप्रीम कोर्टात अंतिम निर्णय होईल. त्यानंतर मुख्य व्हीप शिंदे यांचाच असेल. शेतकरी मालाला भाव मिळण्यासाठी, केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, इतर राज्याच्या तुलनेत आपले राज्य शेतकरीसाठी उपाययोजना करण्यात पूढे आहे. कापूस उगवणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रयत्न करीत आहेत. आपल्या राज्याने शेतकऱ्यांना जास्त नुकसान भरपाई दिली. विमा वाटप ४९ लाख शेतकऱ्याना केले आहे. अजूनही वाटप होणारच आहे. असा दावा त्यांनी केला.

हेही वाचा

 

Back to top button