केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रेशीमबाग कार्यालयाला भेट | पुढारी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रेशीमबाग कार्यालयाला भेट

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून महाराष्ट्राच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. आज नागपूर दौऱ्यात त्यांनी रेशीमबाग येथे डॉ. हेडगेवार स्मारक समिती परिसराला भेट दिली. त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार तथा द्वितीय सरसंघचालक गोलवलकर गुरुजी यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संघाचे नागपूर महानगर संघचालक डॉ. राजेश लोया, सहसंघचालक श्रीधर गाडगे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : 

 

Back to top button