औरंगाबाद : पॉलिसी काढण्याचे अमिष दाखवून १५ लाखांचा गंडा | पुढारी

औरंगाबाद : पॉलिसी काढण्याचे अमिष दाखवून १५ लाखांचा गंडा

औरंगाबाद : पुढारी वृत्तसेवा : पॉलिसी काढण्याचे आमिष दाखवून महिलेला एकाने १५ लाख रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार २०१४ साली घडला. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने १६ फेब्रुवारीला छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र विठ्ठल गायकवाड (रा. भडकलगेट)असे आरोपीचे नाव आहे.

तक्रारदार महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, गायकवाड याने तुमच्या मुलाची पॉलिसी काढून देतो, ७५ लाख रुपयांचा परतावा देतो, असे म्हणत महिलेकडून टप्याटप्याने १५ लाख रुपये घेतले. मात्र, नंतर पॉलिसी न काढून देता फसवणूक केली. तसेच पॉलिसीची बनावट कागदपत्रे तयार केली. प्रकरणाचा पुढील तपास सहायक निरीक्षक पांडुरंग भागिले करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button