हिंगोली : नेपाळी कामगाराने पळविली एक लाख रुपयांची रोकड | पुढारी

हिंगोली : नेपाळी कामगाराने पळविली एक लाख रुपयांची रोकड

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शहरालगत जुन्या औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या हॉटेलच्या गल्ल्यातून नेपाळी कामगाराने १ लाख रुपये पळविली. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात आज (दि.१६) गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु आहे.  दिल्लीराज सातपोटा (रा. जामनीबाजार, जि. सुरखेत, नेपाळ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

शहरालगत जून्या औद्योगिक वसाहतीमध्ये समीर भिसे यांचे हॉटेल आहे. येथे मागील सहा ते सात वर्षापासून सुमारे २० ते २५ नेपाळी कामगार कामावर आहेत. मागील सव्वा वर्षापासून दिल्लीराज सातपोटा (रा. जामनीबाजार, जि. सुरखेत, नेपाळ) हा कामासाठी आला होता. हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांच्या भोजनाचे ऑर्डर घेणे. वेळप्रसंगी काऊंटर सांभाळण्याचे कामही तो करीत होता. बुधवारी सकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास तो हॉटेलमध्ये आला. त्यानंतर गल्ल्यात ठेवलेले एक लाख रुपये घेऊन त्याने पोबारा केला.

सकाळी ११ वाजेपर्यंत तो कामावर आलाच नसल्याने त्याच्यावर संशय आला. समीर भिसे यांनी गल्ल्यातील पैशाची पाहणी केली असता १ लाख रुपये गायब झाल्याचे लक्षात आले. या प्रकारानंतर त्यांनी दिल्लीराज याचा शोध सुरु केला. त्यानंतर गुरुवारी पहाटे हिंगोली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी दिल्लीराज याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक एम. एम. टाले  तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button