वाहतूक कोंडीत बंगळूर जगात दुसर्‍या तर पुणे सहाव्‍या क्रमांकावर !, बंगळूरमध्‍ये १० किलोमीटरच्‍या प्रवासासाठी लागतात २९ मिनिटं! | पुढारी

वाहतूक कोंडीत बंगळूर जगात दुसर्‍या तर पुणे सहाव्‍या क्रमांकावर !, बंगळूरमध्‍ये १० किलोमीटरच्‍या प्रवासासाठी लागतात २९ मिनिटं!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जगातील सर्वात वाहतूक कोंडी असणार्‍या शहरांच्‍या यादीत बंगळूर दुसर्‍या स्‍थानवर पोहचले आहे. डचमधील लोकेशन टेक्‍नॉलॉजी कंपनी ‘टॉमटॉम’ने ट्रॅफिक इंडेक्‍स यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत पुणे सहाव्‍या क्रमांकावर आहे. या अहवालातील माहितीनुसार जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असणार्‍या शहरांमध्‍ये जगात प्रथमस्‍थानी लंडन हे शहर आहे. लंडनमध्‍ये प्रवाशांना १० किलोमीटर अंतर कापण्‍यासाठी ३६ मिनिटे आणि २० सेकंद लागतात.
( Traffic congested cities )

डचमधील लोकेशन टेक्‍नॉलॉजी स्‍पेशालिस्‍ट कंपनी टॉमटॉमने जगभरातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असणार्‍या ५६ देशातील ३८९ शहरांची पाहणी केली. या शहरांमधील प्रवासासाठी लागणारा वेळ, इंधन खर्च आणि कार्बन उत्‍सर्जनाची नोंद करण्‍यात आली. मागील वर्षीच्‍या जगभरातील वाहतूक कोंडीचा विचार करता आयर्लंडमधील डब्लिन तिसर्‍या तर जपनामधील सपोरा आणि इटलीतील मिलान हे अनुक्रमे चौथ्‍या व पाचव्‍या स्‍थानावर आहेत. वाहतूक कोडींत पुणे शहर सहाव्‍या क्रमांकावर होते. विशेष म्‍हणजे या यादीत देशाची आर्थिक राजधानी दिल्‍ली ३४ व्‍या तर देशाची आर्थिक राजधानी मुंबई ४७ व्‍या स्‍थानावर होते.

Traffic congested cities : बंगळूर दहाव्‍या स्‍थानावरुन दुसर्‍या स्‍थानावर

मागील वर्षी बंगळूर शहरातील १० किलोमीटर अंतराचा प्रवास करण्‍यासाठी सरासरी २९ मिनिटे आणि १० सेकंद लागले. तर शहराच्‍या गर्दीच्‍या ठिकाणी २०२१ मध्‍ये वाहनांचा ताशी वेग १४ किलोमीटर प्रतितास इतका होता. २०२१ मध्‍ये जगातील वाहतुकीच्‍या कोंडीत बंगळूर हे दहाव्‍या स्‍थानी होते. तर २०२० मध्‍ये सहाव्‍या क्रमांकावर होते.

‘टॉमटॉम’ने आपल्‍या अहवालात नमूद केले आहे की, शनिवारी १५ ऑक्‍टोबर २०२२ हा दिवस बंगळूर शहरात सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारा ठरला. या शहराच्‍या मध्‍यवर्ती भागात १० किलोमीटरचा प्रवास करण्‍यासाठी त्‍या दिवशी ३३ मिनिटे ५० सेकंद एवढा वेळ लागला. मागील वर्षभरात बंगळूर शहरातील १०किलोमीटर प्रवास करण्‍यासाठी लागणार्‍या सरासरी वेळेमध्‍ये ४० सेकंदांनी वाढ झाली आहे. कार्बन उत्सर्जन (वार्षिक) 1009kg होते तर वाहतूक कोंडीमुळे 275kg होते. मागील वर्षी सकाळच्या गर्दीच्या वेळी, बेंगळुरूवासीयांना प्रति दहा किलोमीटर प्रवासात १५ मिनिटांपेक्षा जास्त आणि संध्याकाळी प्रति १० किमीच्या प्रवासात २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालवावा लागला. शहरात सकाळच्या प्रवासासाठी १९ किलोमीटर प्रतितास संध्‍याकाळी हा वेग १६ किलोमीटर प्रतितास होता.

जगातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असणारी शहरे

 

क्रमांक    शहर         सरासरी प्रवास वेळ        प्रति किमी ताशी

१ )         लंडन           ३६ मिनिटे २० सेकंद          १४

२  )       बंगळूर             २९ मिनिटे १० सेकंद       १८

३ )       डब्लिन            २८ मिनिटे ३० सेकंद         १७

४ )       सपोरो             २७ मिनिटे ३० सेकंद        १९

५ )      मिलान             २७ मिनिटे ३० सेकंद         १८

६ )      पुणे                 २७ मिनिटे २० सेकंद          १९

भारतातील इतर गजबजलेली शहरे (शहर क्षेत्र)

क्रमांक      शहर        सरासरी प्रवास वेळ           प्रति किमी ताशी

३४  )       नवी दिल्ली      २२ मिनिटे १० सेंकद         २४

४७  )        मुंबई         २१ मिनिटे १० सेंकद             २४

 

 

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button