गोव्यात व्हॅलेंटाईनडेसाठी आलेल्या जोडप्याचा बुडून मृत्यू; घरी न सांगताच आले होते फिरायला

गोव्यात व्हॅलेंटाईनडेसाठी आलेल्या जोडप्याचा बुडून मृत्यू; घरी न सांगताच आले होते फिरायला
Published on
Updated on

काणकोण : पुढारी वृत्तसेवा : जगभरात व्हॅलेंटाईन डे म्हणजेच प्रेमाचा दिवस साजरा होत असताना ओवेरे, पाळोळे किनाऱ्यावर प्रेमी युगुलाचे मृतदेह आढळून आले. हे दोघे गाजीयाबाग, उत्तरप्रदेश येथील असून, सुप्रिया दुबे (२६) व विबू शर्मा अशी त्यांची नावे आहेत. या प्रेमीयुगुलाचा मृत्यू बुडून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. बुधवारी (दि. 15) सकाळी आलेल्या या अहवालातून दोघांनीही मद्यपान केल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रेमीयुगुल घरी कल्पना न देता गोव्यात फिरण्यासाठी आले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी प्रथम युवतीचा मृतदेह सापडला. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास विबू शर्मा (२७) याचा मृतदेह ओवरे समुद्रात तरंगताना पोलिसांना सापडला. पोलिस निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी घटनास्थळी धाव घेत, दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी मडगावच्या जिल्हा इस्पितळात पाठविले आहेत.

काणकोण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुप्रिया व विबू शर्मा ओवरे, पाळोळे येथील एका हॉटेलात रविवारी राहण्यासाठी आले होते. दोघेही नातेवाईक असून, सुप्रिया बंगलोर येथे एका खासगी कंपनीमध्ये नोकरीला होती तर विबू शर्मा मुंबईत एका खासगी कंपनीत नोकरीला होता. ही दोघेही गोव्यात आल्याची कल्पना कुटुंबियांना नव्हती, असे पोलिसांनी सांगितले. काणकोण पोलिसांनी या घटनेची माहिती नातेवाईकांना दिली आहे. उद्या सकाळी मृतदेहाची उतरीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

युगुलाचा मृत्यू मद्यपानामुळे

ओवरे-पाळोळे समुद्र किनार्‍यावर 'व्हॅलेंटाईन डे' दिवशीच मृतावस्थेत आढळलेल्या पर्यटक प्रेमीयुगुलाचा मृत्यू बुडून झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले. बुधवारी (दि. 15) सकाळी आलेल्या या अहवालातून दोघांनीही मद्यपान केल्याची माहिती समोर आली आहे.

काणकोण पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत गावस यांनी याबाबत माहिती दिली. हा आत्महत्या किंवा घातपाताचा प्रकार नसल्याचे त्यांनी सांगितले. मडगाव येथील जिल्हा रुग्णालयात सुप्रिया दुबे (26) व विभू शर्मा (27) यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांचे नातेवाईक उत्तर प्रदेशातून आले होते. काणकोण पोलिसांनी दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले. दोन्ही मृतदेह गाजीयाबाग – उत्तर प्रदेश येथे नेण्यात आले असल्याचे काणकोण पोलिसांनी सांगितले.

सुप्रिया आणि विभू लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते, अशी माहिती समोर आली आहे. हे युगुल रविवार सकाळी पाळोळे किनार्‍याचा दक्षिणेकडील एक भाग असलेल्या ओव्हरे समुद्रकिनार्‍यावर एका हाँटेलमध्ये उतरले होते. सोमवारी संध्याकाळी त्यांना किनार्‍यावर फेरफटका मारताना अनेकांनी पाहिले होते. सुप्रिया हिचा मृतदेह मंगळवारी सकाळी 7 च्या सुमारास सापडला तर विभू शर्माचा मृतदेह दुपारी समुद्रात तरंगताना आढळला. पोलिस निरीक्षक गावस पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news