हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यात १६ केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत | पुढारी

हिंगोली: औंढा नागनाथ तालुक्यात १६ केंद्रावर शिष्यवृत्ती परीक्षा सुरळीत

औंढा नागनाथः पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (५वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (८वी) १६ केंद्रावर आज (दि.१२) पार पडली. शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के आणि गटशिक्षणाधिकारी श्रीपाद पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा झाली. नागनाथ विद्यालयातील परीक्षा केंद्रावर गटशिक्षणाधिकारी पुराणीक यांनी भेट दिली. परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होऊ नये, म्हणून पथके स्थापन करण्यात आली होती.

औंढा तालुक्यातील एकूण १६ परीक्षा केंद्रावर एकूण २ हजार २७६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. नागनाथ विद्यालय औंढा नागनाथ, प्राथमिक शाळा दुधाळा, केंद्रीय प्राथमिक शाळा पिंपळदरी, मेथा, सिद्धेश्वर, प्राथमिक शाळा साळणा, केळी, सरस्वती प्राथमिक शाळा जवळाबाजार, श्री शांती विद्यामंदिर शिरडशहापूर, नागेश्वर प्राथमिक शाळा औंढा नागनाथ, प्रशाला येहळेगाव सोळंके, प्राथमिक शाळा जलालदाभा, मधोमती विद्यालय लाख, प्राथमिक शाळा रामेश्वर, इंदिरा गांधी कन्या विद्यालय जवळा बाजार, प्राथमिक शाळा कन्या उर्दू शिरडशहापूर अशा १६ केंद्रावर ही परीक्षा पार पडली.

शिष्यवृत्ती परीक्षा केंद्रासाठी गटसाधन केंद्रातील परीक्षा विभाग प्रमुख सीमा पटाईत, मनोज कांबळे, पांडुरंग सूर्यवंशी, दिलीप रसाळ, संजय पाटील, शिवाजी टोम्पे, वैशाली आमले, शेख रुबिना आदींनी परिश्रम घेतले.

हेही वाचा 

Back to top button