

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोली जिल्हा पोलिस दलातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी बुधवारी (दि.८) रात्री उशीरा काढले. बदली झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये हिंगोली शहराचे पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे यांची स्थानिक गुन्हे शाखेत, गुन्हे शाखेचे उदय खंडेराय हिंगोली ग्रामीण, आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सोनाजी आम्ले हिंगोली शहर, कळमनुरीचे सुनील निकाळजे पोलिस कल्याण विभागात, विशेष शाखेचे शिवाजी गुरमे आर्थिक गुन्हे शाखेत, नियंत्रण कक्षातील वैजनाथ मुंडे कळमनुरी, हिंगोली ग्रामीणचे रामकृष्ण मळघने विशेष शाखेत बदली झाली आहे.
नियंत्रण कक्षातील सहायक पोलिस निरीक्षक माधव कोरंटलू नागरी हक्क संरक्षण विभागात, सेनगावच्या दीक्षा लोकडे औंढा नागनाथ, वसमत ग्रामीणचे विलास चवळी बासंबा, भरोसा सेलच्या विशाखा धुळे पोलिस अधिक्षकांचे वाचक, हिंगोली शहरचे अनिल काचमांडे वसमत ग्रामीण, वसमतचे गजानन बोराटे हट्टा, नर्सीचे सुनील गिरी हिंगोली शहर, अर्ज शाखेच्या रेखा शहारे कळमनुरी, नियंत्रण कक्षातील शिवसांब घेवारे सायबर सेल, नियंत्रण कक्षातील रवी हुंडेकर गोरेगाव पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे.
हिंगोली शहरचे उपनिरीक्षक विक्रम विठुबोने स्थानिक गुन्हे शाखेत, सायबर सेलच्या भाग्यश्री कांबळे हिंगोली ग्रामीणमध्ये, कळमनुरीचे कृष्णा सोनुले, वसमतचे राम महिपाले वसमत, कुरुंद्याचे युवराज गवळी, औढ्याचे मुंजाजी वाघमारे यांना त्याच ठिकाणी देण्यात आले. बासंबाचे सुरेश भोसले वसमत शहर, औढ्याच्या सुवर्णा वाळके हिंगोली शहर, गोरेगावचे गजानन पाटील वसमत शहर, वसमतचे बाबासाहेब खार्डे अनैतिक मानवी वाहतुक कक्ष, पोलिस उपअधीक्षक ग्रामीण यांचे वाचक सदानंद मेंडके वसमत शहर तर नियंत्रण कक्षातील किशोर पोटे यांची पोलिस उपाधिक्षक ग्रामीण याठिकाणी बदली करण्यात आली आहे.