हिंगोली : वसमतमध्ये महिलेची ३.११ लाखांची फसवणूक

हिंगोली : वसमतमध्ये महिलेची ३.११ लाखांची फसवणूक
Published on
Updated on

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा : येथील एका महिलेस बँकेच्या खात्याची सत्यता पडताळण्यासाठी रिव्हर्स अकाऊंट असल्याचे सांगत बँक खात्यात ३. ११ लाख रुपये पाठविण्यास सांगितले. मात्र सदर रक्कम परत पाठवलीच नाही. यामुळे फसवणुक झाल्याचे लक्षात येताच महिलेने वसमत पोलिस ठाणे तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी रणदीपसिंग नावाच्या भामट्या विरुध्द मंगळवारी (दि.०७) रात्री उशीरा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसमत येथील एका महिलेचा पुणे येथे फ्लॅट आहे. सदर फ्लॅट भाडेतत्वावर देण्यासाठी त्यांनी जाहिरात दिली होती. त्यावरून उत्तरप्रदेशातून रणदीपसिंग नावाच्या व्यक्तीने त्यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क साधून फ्लॅट भाड्याने घेणार असल्याचे सांगितले. आपण सैन्य दलात असून माझी पोस्टींग पुणे येथे झाली आहे. त्यामुळे मला फ्लॅट हवा आहे. आम्ही देशाची सेवा करत असल्याचे सांगून भावनिक केले.

त्यानंतर फ्लॅट भाडण्याने देण्याबाबत सदर महिलेने होकार दिल्यानंतर त्याने 'आमचे सैन्य दलाच्या जवानांचे बँक अकाऊंट रिव्हर्स अकाऊंट असते, दोन्ही बँक खात्याची खात्री होणे आवश्यक असल्याचे' सांगत काही रक्कम त्यात भरण्यास सांगितली. त्यानंतर महिलेने थोडी रक्कम त्यात भरल्यानंतर काही वेळातच रक्कम परत त्यांच्या बँक खात्यात आली. मात्र त्यानंतर रणदीपसिंग याने ३.११ लाख रुपयांची रक्कम भरून घेतली. मात्र सदर रक्कम परत आलीच नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या महिलेने मंगळवारी रात्री वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी रणदीपसिंग यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम पुढील तपास करीत आहेत. या संदर्भात महिलेशी दुरध्वनीवरुन संपर्क साधला असता त्यांनी आपण अद्यापही या धक्यातून सावरलो नसल्याचे सांगितले.

हे वचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news