बीड : अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, दिरांकडून भावजयीवर अत्याचार | पुढारी

बीड : अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, दिरांकडून भावजयीवर अत्याचार

गेवराई (जि. बीड) : पुढारी वृत्तसेवा – शहरातील एका विवाहित महिलेवर तिच्या दोन दिरांनी बलात्कार केल्याची खळबजनक घटना उघडकीस आली आहे. तसेच या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपीला गेवराई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

बादशाह महेबूब सय्यद (वय २८), फैज शेरू शेख (वय २५) दोघे राहणार गेवराई अशी आरोपींची नावे आहेत. पीडितेने सांगितले की, ”गेल्या पाच ते सहा महिन्यांपूर्वी आपले पती बाहेर गेल्यानंतर बादशाह हा घरी जेवण करण्यासाठी आला. त्याला मी जेवण दिले व किचनमध्ये निघून आले. त्याने मला आवाज दिला व आपल्याजवळ बोलावले. मी गेले असता त्याने त्याच्याकडील मोबाईलमध्ये मी अंघोळ करत असलेले फोटो व व्हिडिओ दाखवले आणि धमकी दिली की, तू जर माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीतर मी हे अश्लिल फोटो व व्हिडिओ फेसबूकवर अपलोड करून व्हायरल करेन. यानंतर मी हा सगळा प्रकार सासरे यांना सांगितला. परंतु त्यांनी पण माझ्यावर विश्वास ठेवला नाही. उलट माझ्या मुलावर माझा विश्वास आहे, असे सांगून वेळ मारून नेली. परंतु इतक्यावरच न थांबता असेच मला एकटीला पाहून माझ्या दिराने माझ्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच त्याचा मावस भाऊ फैज याला एकदिवस सोबत घरी आणून त्याने आपल्याला गाडी घेण्यासाठी मदत केली आहे. म्हणून तू त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेव असे म्हणाला. मी नकार दिला. परंतु तो त्याला घरीच सोडून गेला. फैजने माझ्यावर बळजबरीने अत्याचार केला. ही घटना मी माझ्या आई-वडिलांना सांगितली.”

पोलिसांत पीडितेने तक्रार दिली असून या प्रकरणी गेवराई पोलिसांनी वरील आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास उपनिरीक्षक शिवाजी भुतेकर करत आहेत.

Back to top button