Earthquake in Turkey : तुर्कस्‍तान, सीरियात मृत्‍यूचे तांडव, भूकंपबळींची संख्‍या २३०० वर

Earthquake in Turkey : तुर्कस्‍तान, सीरियात मृत्‍यूचे तांडव, भूकंपबळींची संख्‍या २३०० वर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: तुर्कस्‍तान आणि सीरिया आज पहाटे शक्‍तीशाली भूकंपाने हादरले. या भीषण नैसर्गिक आपत्तीला १२ तास उलटल्‍यानंतर आता भूकंपाची भीषणता समोर येत आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु असतानाच मृतांचा आकडाही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. तुर्कस्तानमध्ये ९०० हून अधिक तर सीरियात ४०० हून अधिक नागरिकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त 'एपी'ने (The Associated Press) दिले आहे. यापूर्वी २४ वर्षापूर्वी म्हणजे १९९९ मध्ये तुर्कस्‍तानमध्ये  झालेल्या शक्तीशाली भूकंपात १७ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. यानंतरचा हा सर्वात मोठा भूकंपाचा तडाखा मानला जात आहे.

सोमवारी पहाटे ७.८ रिश्टर इतक्या तिव्रतेचा भूकंप झाल. या भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कीच्या गाझियानटेप शहराजवळ होता. त्यानंतर काही तासांत अनेक शेजारील देशांना आणि परिसराला या तिव्र भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. तुर्कितील या भूकंपाचे धक्के तुर्की, सीरिया, लेबनॉन, सायप्रस आणि इस्रायलमधील लाखो लोकांना जाणवले असून यामधील तुर्कस्थान आणि सीरियात मोठ्या प्रमाणात जिवीत आणि वित्त हानी झाली आहे.

युद्ध पातळीवर बचावकार्य

सीरियाच्या सीमेजवळ दक्षिण-पूर्व तुर्कस्तानला झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने शेकडो लोक मरण पावले तर शेकडो लोक जखमी झाले. तुर्की आणि सीरियामधील अधिका-यांच्या सुरुवातीच्या विधानांनुसार आत्तापर्यंतची मृतांची संख्या १०० हजारहून अधिक आहे, तर या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता येथील यंत्रणेने दर्शवली आहे. तीव्र भूकंपानंतर तुर्कीने आणीबाणीची घोषित केली आहे. तसेच   बचावकार्यही युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

तुर्कीच्या मदतीसाठी भारत धावला

तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या भीषण भूकंपानंतर भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला असून तुर्कस्तानला मदत पाठवण्यासाठी भारत आपले वैद्यकीय आणि बचाव पथक पाठवणार असल्याचे सांगितले. भूकंपानंतरच्या परिस्थितीबाबत पंतप्रधान मोदींच्या पुढाकाराने पीएमओमध्ये बैठक पार पडली. यात 100 सदस्यीय एनडीआरएफचे पथक आणि वैद्यकीय मदत साहित्यही तुर्कस्तानला पाठवण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news