Border Gavaskar Trophy : बॉर्डर-गावसकर मालिकेत सर्वाधिक शतके कोणाच्या नावावर? | पुढारी

Border Gavaskar Trophy : बॉर्डर-गावसकर मालिकेत सर्वाधिक शतके कोणाच्या नावावर?

पुढारी ऑनलाईन डेस्क : Border Gavaskar Trophy : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बहुचर्चित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. भारताने ही मालिका 9 वेळा, तर ऑस्ट्रेलियाने 5 वेळा जिंकली आहे. एक मालिका ड्रॉ राहिली आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये एका मालिकेत सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत विराट कोहली भारतीय फलंदाजांमध्ये पुढे आहे.

कोहलीने (Virat Kohli) 2014 मध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेत एकूण 4 शतके झळकावली आहेत. महेंद्रसिंग धोनीने (MS Dhoni) अचानक कर्णधारपद सोडल्यानंतर त्यावर्षी कसोटीत कोहलीकडे कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले. शतक ठोकण्याच्या बाबतीत चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुजाराने 2018 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 3 शतके झळकावली आहेत. यानंतर भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. (Border Gavaskar Trophy)

कोहलीने एका मालिकेत 4 शतके झळकावली (Border Gavaskar Trophy)

सचिनने (Sachin Tendulkar) 1998 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन शतके झळकावली होती. सचिननंतर व्हीव्हीएस लक्ष्मणचे नाव येते. सचिनने हा पराक्रम दोनदा केला आहे. 2007 मध्येही सचिनने 2 शतके झळकावली होती. त्यानंतर 2003 मध्ये झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये लक्ष्मणने दोन तर माजी सलामीवीर फलंदाज गौतम गंभीरने 2008 मध्ये दोन शतके झळकावली होती. या यादीत मुरली विजयचे नाव शेवटी आहे. 2013 मध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये विजयने 2 शतके फटकावली होती.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या मालिकेत सर्वाधिक शतके फटकावणारे भारतीय फलंदाज

  • विराट कोहली (2014) : 4 शतके
  • चेतेश्वर पुजारा (2018) : 3 शतके
  • सचिन तेंडुलकर (1998) : 2 शतके
  • व्हिव्हिएस लक्ष्मण (2003) : 2 शतके
  • सचिन तेंडुलकर (2007) : 2 शतके
  • गौतम गंभीर (2008) : 2 शतके
  • मुरली विजय (2013) : 2 शतके

सचिन तेंडुलकरच्या सर्वाधिक धावा

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये (Border Gavaskar Trophy) सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन 1996 ते 2013 दरम्यान बॉर्डर-गावसकर ट्रॉफी खेळला. यादरम्यान त्याने 3262 धावा फटकावल्या. नाबाद 241 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग दुसऱ्या स्थानावर आहे. पाँटिंगने 1996 ते 2012 पर्यंत खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमधील एकूण सामन्यांत 2555 धावा तडकावल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या 257 धावा आहे.

Back to top button