हिंगोली : बदनामीची धमकी देत विवाहित महिलेवर अत्याचार

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोली तालुक्यातील अमला येथे महिलेचे आंघोळ करतानाचे छायाचित्र सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची घटना शनिवारी (दि. ४) उघडकीस आली. परमेश्वर कोरडे असे या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमला येथील एक महिला आंघोळ करतानाचे छायाचित्र शेजारी राहणाऱ्या परमेश्वर कोरडे याने मोबाईलमध्ये मार्च २०२१ मध्ये काढले. सदर छायाचित्र सोशल मीडियावर टाकून बदनामी करण्याची धमकी त्याने महिलेस दिली. त्याने बदनामीची धमकी देऊन वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर त्या महिलेस जबरदस्तीने मोबाईल वापरण्यासाठी दिला. त्याच्याकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून महिलेने याबाबत पती व कुटुंबाला सांगितले. त्यानंतर महिलेच्या कुटुंबाने परमेश्वर याच्याकडे जाऊन जाब विचारला असता त्याने महिलेच्या कुटुंबाला देखील जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर त्या महिलेने हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेतली.
- पुणे : सव्वालाख तरुणाईचा नशामुक्तीचा संकल्प
- कामे करूनही निवडून येण्याची गॅरंटी नाही; आ. राम शिंदेना अश्रू अनावर
- नगर : अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा; चार लाखांचा मुद्देमाल जप्त