बीड : चौसाळा-बीड रोडवर पोलिसांनी 36 लाखांचा गुटखा पकडला | पुढारी

बीड : चौसाळा-बीड रोडवर पोलिसांनी 36 लाखांचा गुटखा पकडला

नेकनूर पुढारी वृत्तसेवा : चौसाळा ते बीड जाणाऱ्या रोडवर पहाटे उदंड वडगाव येथे शनिवारी (दि.४) गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला. कारवाईत पोलिसांनी गुटख्यासोबत, ट्रक आणि मोबाईलसह एकूण 51 लाख 20 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

या बद्दलची अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि.4) पहाटे गुटखा घेऊन जाणारा ट्रक (जीजे १२ ए वाय ९४२५) सोलापूर ते बीड रोडने मांजरसुंबा मार्गे बीड येथे बसव कल्याण येथून जात होता. शनिवारी पहाटे चौसाळा ते बीडला जाणाऱ्या रोडवर उदंड वडगाव येथे रोडवर हा ट्रक पोलिसांनी पकडला. या कारवाईत ट्रक चालक वजीर इम्रान गुल मोहम्मद व समीर सुलेमान नोतियार यांना ताब्यात घेतले. ट्रकमध्ये गोवा गुटख्याची 160 पोती होती. त्याची किंमत अंदाजे 36 लाख रुपये, ट्रक किंमत पंधरा लाख रुपये, दोन मोबाईल 20000 रुपये असा एकूण 51 लाख वीस हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी नेकनूर येथे पोलीस हेड कॉन्स्टेबल बालाजी दराडे यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, राजू वंजारे, विकास चोपणे, संजय टुले, दिलीप गीते, अनिल मंदे, सचिन अहंकारे यांनी केली.

हेही वाचा

Back to top button