नवरोबा फेशियलसाठी गेला ‘सलून’ला; ‘तो’ न परतल्‍याने धाकट्या भावाने उरकले लग्‍न | पुढारी

नवरोबा फेशियलसाठी गेला 'सलून'ला; 'तो' न परतल्‍याने धाकट्या भावाने उरकले लग्‍न

उत्‍तर प्रदेश; पुढारी ऑनलाईन : उत्‍तर प्रदेशच्या पीलीभीतमध्ये लग्‍नाचे एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. येथे एक नवरा मुलगा लग्‍नाच्या दिवशी तयार होण्यासाठी सलूनला जावून येतो म्‍हणून गेला. मात्र बराच वेळ गेला तरी तो घरी परतला नाही. त्‍याला खूप फोन करण्यात आले. त्‍याचा शोधही घेण्यात आला. मात्र त्‍याचा काही पत्‍ता लागला नाही. अशावेळी घरच्यांनी नवऱ्या मुलाच्या धाकट्या भावाला नवरा बनवून लग्‍न मंडपात नेले. या युवकाचा कोणा दुसऱ्या मुलीवर जीव होता, त्‍याला हे लग्‍न करायचे नव्हते. त्‍यामुळे तो लग्‍नादिवशी कोठेतरी निघून गेल्‍याची चर्चा गावात होती.

या विषयी माहिती अशी की, लग्‍नाची सगळी तयारी झाली होती. सगळी मंडळी वरातीत जाण्यासाठी तयार होते. पण नवरा मुलगा शेव्हिंग, केसांना कलर करायचा आहे आणि चेहऱ्याचे फेशियल करायचे आहे, असे सांगून घरातून बाहेर पडला. सकाळची दुपार झाली तरी मुलगा काही घरी परतला नाही. तेव्हा मुलाचे कुटुंबीय आणि नातेवाईक मंडळी चिंतेत पडली. त्‍यांनी मुलाला फोन लावला तर, त्‍याचा मोबाईल स्‍विच ऑफ येत होता. रात्रीचे ९ वाजले. नवरा मुलगा फरार झाल्‍याची माहिती वधूपक्षालाही मिळाली. यानंतर दोन्ही पक्ष्रात चर्चा, बोलणी सुरू झाली. यामध्ये दोन्ही कुटुंबांनी नवऱ्या मुलाच्या धाकट्या भावाला नवरा मुलगा म्‍हणून लग्‍नाला उभा करण्याचे ठरवले. नवरी मुलगीनेही या गोष्‍टीला होकार दर्शवला. मग काय सगळ ठरलेलं तसंच झालं. फक्‍त नवरा तेवढा बदलला.

या सर्व प्रकरणावर वधू पक्षाने नाराजी व्यक्‍त केली, जर मुलाला जायचे होते तर त्‍याने आधीच जायला हवे होते, लग्‍नादिवशीच का गेला? दुसरीकडे वर पित्‍याला आपल्‍या मुलाची चिंता लागल्‍याने त्‍यांनी पोलिस स्‍टेशनमध्येही तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी त्‍याच्या मोबाईल फोनचे लोकशन काढले. त्‍यामध्ये ते बमरोली रोड दाखवत होते. या प्रकरणावर पोलिसांनी सांगितले की, मुलाच्या मर्जी विरूद्ध त्‍याचे लग्‍न लावून दिले जात होते. त्‍यामुळे तो नाराज होता. मात्र पोलिसांना मुलाच्या घरात कोणतीही चिठ्ठी वगेरे मिळालेली नाही.

हेही वाचा : 

Back to top button