बीड जिल्ह्याची संपूर्ण ताकद किरण पाटलांच्या पाठीशी; आमचा विजय निश्चित – पंकजा मुंडे

बीड जिल्ह्याची संपूर्ण ताकद किरण पाटलांच्या पाठीशी; आमचा विजय निश्चित – पंकजा मुंडे

गेवराई (बीड), पुढारी वृत्तसेवा : भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी भाजप ही व्यक्तीकेंद्रीत पार्टी नसून ही एक संस्था असल्याचे सांगत पाटील यांची उमेदवारी आपल्याला विश्वासात घेऊन देण्यात आल्याचे म्हटले. पाटील यांच्या विजयासाठी बीड जिल्ह्याची पुर्ण ताकद त्यांच्या पाठिशी उभा करू आणि त्यांचा विजय निश्चित असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. त्या औरंगाबाद शिक्षक मतदारसंघाच्या भाजप उमेदवार पाटील यांच्या प्रचार सभेत गेवराई येथे बोलत होत्या. या वेळी व्यासपीठावर खा. प्रितम मुंडे, आ. लक्ष्मण पवार, राजेंद्र मस्के, संजय केणेकर, उमेदवार किरण पाटील, अक्षय मुंदडा, प्रवीण घुगे आदी उपस्थित होते.

किरण पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून या मतदारसंघात विजयाची मोहर पसरल्याचा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी व्यक्त केला. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले, भर दिवाळीच्या दिवशी आझाद मैदानावर उपोषण करत शिक्षक बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकारला भाग पडणारे शिक्षक नेते किरण पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यापासून मतदारसंघात विजयाची मोहर पसरत असल्याचे दिसत आहेत.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news