जालना : दुचाकीची बैलगाडीला धडक, महिला पोलीस जागीच ठार | पुढारी

जालना : दुचाकीची बैलगाडीला धडक, महिला पोलीस जागीच ठार

भोकरदन; पुढारी वृत्तसेवा : दुचाकीची बैलगाडीला धडक बसून झालेल्‍या अपघातात महिला पोलिस जागीच ठार झाली. सुनीता ईश्वरसिंग ढोबाळ असे त्‍यांचे नाव आहे. या दुर्घटनेत त्‍यांचा मुलगा जखमी झाला आहे. ही दुर्घटना भोकरदन रोडवरील राजूरजवळच्या ठाकूरद्वार हॉटेलसमोर आज (दि.१५) सकाळी घडली.

सुनीता ढोबाळ आज सकाळी आपल्‍या मुलासह दुचाकीवरून भोकरदन तालुक्यातील इब्राहिमपूर या मूळगावी जात होत्‍या. राजूरजवळ त्‍यांची दुचाकी बैलगाडीला धडकली. सुनीता ढोबाळ यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकी चालवित असलेला त्यांचा मुलगा रोहन (वय १८) गंभीर जखमी झाला. सुनीता ढोबाळ या पतीच्या निधनानंतर अनुकंपा तत्वावर पोलीस खात्यात भरती झाल्या होत्या. त्‍यांच्‍या अपघाती निधनाने पोलीस दलात आणि नातेवाईकांत हळहळ व्यक करण्यात येत आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button