लातूर जिल्ह्यात आशियाई पक्षीगणनेस सुरूवात; कव्हा तलावावर आढळले ३६ प्रजातींचे पक्षी

लातूर जिल्ह्यात आशियाई पक्षीगणनेस सुरूवात; कव्हा तलावावर आढळले ३६ प्रजातींचे पक्षी
Published on
Updated on

लातूर, पुढारी वृतसेवा : पाणपक्षांची नेमकी स्थिती अजमावण्याच्या व त्यांच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या उद्देशाने घेण्यात येणाऱ्या आशियाई पाणपक्षी गणनेस जिल्ह्यात शनिवारी (दि.७) सुरूवात करण्यात आली. लातूर नजिक कव्हा येथे वनविभाग व जैवविविधता समितीच्या वतीने करण्यात आलेल्या पहाणीत देशी व विदेशी पक्षांच्या सुमारे ३६ प्रजाती आढळल्या. २२ जानेवारीपर्यंत ही गणना चालणार आहे.

गेल्या काही वर्षात भारतातील पाणपक्षी संकटात सापडले असून, विविध कारणांमुळे त्यांचे अधिवास धोक्यात आले आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी त्यांचा अधिवास, खाद्य उपलब्धता व संख्येवर लक्ष ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी एशियन वॉटर बर्ड काउंटच्या पुढाकारातून ७ ते २२ जानेवारी दरम्यान देशभरात पाणपक्षी गणना केली जाते. पाहणीत आढळलेल्या पक्षांची माहिती व छायाचित्रे ई बर्ड संकेतस्थळावर टाकली जातात. त्यानुसार त्यांच्या संवर्धनाचा आराखडा व उपाययोजना करणे सोपे जाते, असे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामपुरे यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यात विभागीय वनाधिकारी बाळकृष्ण पौळ, सहाय्यक वन संरक्षक वृषाली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या गणनेत लातुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रामपुरे, जैवविविधता समिती सदस्य शहाजी पवार, धनंजय गुट्टे, पक्षीमित्र हेमंत रामढवे, मंगेश खेडकर, वनपरिमंडळ अधिकारी निलेश बिराजदार, मानद वन्यजीव संरक्षक राहुल जवळगे, वनरक्षक बालाजी पाटील, महेश पवार आदिंनी सहभाग घेतला. निलंगा वनपरिक्षेत्र अंतर्गत मसलगा तलावावर पक्षीगणना करण्यात आली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी शिल्पा गित्ते, पक्षिमित्र धनंजय गुट्टे व स्थानिक पक्षीप्रेमींनी सहभाग घेतला. दरम्यान टॅगिंग केलेला एकही पक्षी शनिवारी केलेल्या पाहणीत आढळला नाही.

'हे' आढळले पक्षी

ब्राम्हणी बदक, थापट्या, हळदी-कुंकू बदक, पिनेटल डक, टिबूकली, वारकरी, गायबगळे, जांभळी पाणकोंबडया, पांढऱ्या छातीच्या पाणकोंबडया, शेकाट्या, तुटवार, रफ, गॉडविट, कॉमन स्नाईप, तुतारी, रंगीत करकोचा, छोटा पाणकावळा, लहान बगळे, ढोकरी, कुदळ्या, खंड्या, मार्श हॅरीयर, पाकोळी हे पक्षी आढळून आले आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news