परभणी : अपक्ष पॅनल म्हणून लढलेल्या पॅनलच्‍या सरपंचासह ग्रा.पं. सदस्यांनी केला काँग्रेसमध्‍ये प्रवेश | पुढारी

परभणी : अपक्ष पॅनल म्हणून लढलेल्या पॅनलच्‍या सरपंचासह ग्रा.पं. सदस्यांनी केला काँग्रेसमध्‍ये प्रवेश

चारठाणा(परभणी), पुढारी वृत्‍तसेवा : जिंतूर तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राजेगाव येथे अपक्ष पॅनल निवडून आले. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने अधिकृत पॅनल उभा केला नव्हते. परंतु विजयानंतर अपक्ष पॅनलच्या प्रमुखांनी व नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकांमध्ये राजेगाव, गारखेडा व पांढरगळा ही  ग्रामपंचायत अपक्ष पॅनल म्हणून लढलेल्या पॅनल विजयी झाले.  या निवडणुकीत अपक्ष पॅनलमध्ये काँग्रेस विचाराचे उमेदवार उभे असल्याने पक्षाने अधिकृत पॅनल उभा केले नव्‍हते. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, आणि ग्रामपंचायत सदस्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या प्रसंगी काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, प्रदेश उपाध्यक्ष यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रवेशामुळे चारठाणा गटामध्ये पार पडलेल्या निवडणुकीत भाजप माणकेश्वर व सोस 2 जागेवर ,कॉंग्रेस राजेगाव व जांब 2 जागेवर तर सोनापूर अपक्ष असे चित्र बदलले आहे.

हेही वाचा : 

Back to top button