उद्धव ठाकरेंच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदाची हवा गेली होती : एकनाथ शिंदे | पुढारी

उद्धव ठाकरेंच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदाची हवा गेली होती : एकनाथ शिंदे

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री कंगना राणावतचे घर पाडण्यासाठी पैसे देण्यात आले. मुख्यमंत्री जनतेसाठी सोडा तर आमदारांसाठी देखील उपलब्ध होत नव्हते.  उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात मुख्यमंत्रीपदाची हवा गेली होती, अशी घणाघाती टीका एकनाथ शिंदे यांनी विधासभेत अंतिम प्रस्तावाला उत्तर देताना केली. माझ्यावर बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा प्रभाव आहे, त्यामुळेच आम्ही उठाव केला, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी या वेळी केला.

ज्यांचा गृहमंत्री जेलमध्ये गेला त्यांनी आम्हाला कायदा व सुव्यवस्थेबाबत विचारवे? असा सवालही एकनाथ शिंदे विधानसभेत अंतिम प्रस्तावला उत्तर देताना केला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गेल्या चार महिन्यात राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप केला होता. त्यालाही शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. आमचे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. याची ग्रामपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून पोचपावती मिळाली आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना बहुमताने जिंकेल, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला.

फेब्रुवारीपर्यंत शिंदे-फडणवीस सरकार टिकेल, असा दावा महाविकास आघाडीने केला होता. महाविकास आघाडीच्या या दाव्याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे म्हणाले, तुम्ही आमचं सरकार फेब्रुवारीपर्यंत टिकेल असे म्हणत आहात मात्र, कोणत्या वर्षीची फेब्रुवारी हे सांगत नाहीत. भ्रष्टाचाराला आम्ही थारा देत नाहीत. आमच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. असेही शिंदे या वेळी बोलताना म्हणाले.

हेही वाचलंत का?

Back to top button