PCB Ramiz Raja : भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या रमीज राजा यांची 'पीसीबी'तून हकालपट्टी, नजम सेठी नवे अध्‍यक्ष | पुढारी

PCB Ramiz Raja : भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या रमीज राजा यांची 'पीसीबी'तून हकालपट्टी, नजम सेठी नवे अध्‍यक्ष

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष रमीज राजा (PCB Ramiz Raja) यांची त्यांच्या पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. रमीज राजा हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत होते. भारताविरोधात देखील त्यांनी अनेकदा वादग्रस्‍त विधाने केली होती. त्‍यांना पदावरुन काढून टाकल्याचे घोषणा  पाकिस्तान सरकारने आज (दि. २१) केली.

गेल्या काही दिवसांपासून रमीज रजा (PCB Ramiz Raja)  यांना त्यांच्या पदावरुन हटवण्याबाबतच्या चर्चा होत्या. त्यांनी या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे देखील सांगितले होते. सरकारकडून त्यांना याबाबत कोणतेही निर्देश आले असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले होते.  मात्र आज पाकिस्तान सरकारने त्यांची अध्यक्षपदावरुन हकालपट्टी केली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या क्रिकेट बोर्डच्‍या अध्‍यक्षपदी नजम सेठी यांची निवड करण्यात आली आहे. पाकिस्तान सरकारकडून पीसीबीच्या या नव्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्‍यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button