परभणी : स्कूल बस-एसटी बसच्या अपघातात शालेय विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी | पुढारी

परभणी : स्कूल बस-एसटी बसच्या अपघातात शालेय विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी

गंगाखेड पुढारी वृत्तसेवा : शहरातील एका शाळेच्या शालेय सहलीसाठी विद्यार्थी घेऊन निघालेल्या स्कूल बसचा गंगाखेड – राणीसावरगाव रस्त्याजवळील ईळेगाव परिसरात समोरासमोर अपघात झाला. विद्यार्थ्यांसह २२ ते २५ जण जखमी झाले असून चौघा गंभीर जखमींना आंबेजोगाई व परभणीच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आज सकाळी (दि.११) शहरातील एका शाळेची शालेय सहल लातूर येथे निघाली होती. सकाळी ९ वाजताच्या दरम्यान गंगाखेड – राणीसावरगाव रस्त्यावरील ईळेगाव पाटीनजीक एसटी बस व शालेय स्कूलबसचा अपघात झाला. त्यात अनेक विद्यार्थ्यांसह एसटी बसमधील प्रवाशीही जखमी झाले आहेत. दरम्यान घटनेचे वृत्त कळताच, जखमींना उपजिल्हा रुग्णालयात हलविल्यानंतर यापैकी चार गंभीर जखमींना आंबेजोगाई व परभणीच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले आहे.

हेही वाचा

Back to top button