इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोणतेही काम पूर्णत्वाला नेता येते : सयाजी शिंदे | पुढारी

इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोणतेही काम पूर्णत्वाला नेता येते : सयाजी शिंदे

कुरुंदा (हिंगोली), पुढारी वृत्तसेवा : कुरुंदा येथील सह्याद्री देवराई टोकाईगडावर गुरुवारी सह्याद्री देवराईचे संस्थापक सिनेअभिनेते सयाजी शिंदे, दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री कल्पना सैनी व हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्रातील पहिला वृक्ष जागर सोहळा संपन्न झाला.

महाराष्ट्रातील नष्ट झालेल्या देवराई पुन्हा नव्याने उभारण्याचे काम सह्याद्री देवराई ह्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जवळपास चाळीस ठिकाणी सुरू आहे. त्यातीलच हिंगोली जिल्ह्यातील कुरूंदा येथील टोकाईगडावरील गेल्या चार वर्षांपासून वृक्षलागवड आणि वृक्षसंगोपनाचे काम सह्याद्री देवराई टोकाईगड परिवाराच्या अविरतपणे करत आहे. त्या कामाची दखल घेत टोकाईगडाला भेट देण्याच्या, येथील वृक्षप्रेमी बांधवांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने या वृक्ष जागर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी सयाजी शिंदे, अभिनेत्री कल्पना सैनी, सह्याद्रीचे सचिव चंदने, स्मिता जगताप, हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, तहसीलदार अरविंद बोळंगे, मुंजाजीराव इंगोले, रामदास पवार आणि सोबतच पत्रकार बंधु भगिनी, तहसील कर्मचारी, पुलीस प्रशासनातील कर्मचारी, शासकीय आरोग्य कर्मचारी, नरहर कुरुंदकर विद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सह्याद्री देवराई टोकाईगड फाऊंडेशनचे मंगेश दळवी, मंगेश इंगोले, ॲड. वैभव जाधव, किशोर फेदराम, कृष्णा बागल, नितीन इंगोले, गजानन फुलारी, गजेंद्र येल्हारे, गणेश वटमे, मंगेश देशमुख, प्रल्हाद शिंदे, बबनराव इंगोले, संजीवकुमार बेंडके, जितेंद्र महाजन व समस्त सह्याद्री देवराई टोकाईगड फाऊंडेशनने प्रयत्न केले.

.हेही वाचा 

कोल्‍हापूर : बुबनाळ ग्रामपंचायत सरपंचपदी सुप्रिया मालगांवे बिनविरोध

युट्युबवरच्या अश्लील जाहिरातींमुळे फेल झालो, गुगलने 75 लाखांची भरपाई द्यावी; सुप्रीम कोर्ट म्हणाले…

‘बॉम्‍बे टू गोवा’ मुव्ही नाही ‘स्विमिंग’; ६ जलतरणपटू करणार ११०० किमी अंतर पार

Back to top button