कोल्‍हापूर : बुबनाळ ग्रामपंचायत सरपंचपदी सुप्रिया मालगांवे बिनविरोध | पुढारी

कोल्‍हापूर : बुबनाळ ग्रामपंचायत सरपंचपदी सुप्रिया मालगांवे बिनविरोध

कवठेगुलंद (कोल्‍हापूर), पुढारी वृत्तसेवा :  बुबनाळ तालुका शिरोळ येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुप्रिया मालगांवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सुकुणा समितीने ठरवल्या प्रमाणे मावळते सरपंच सारिका राजमाने यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते.

शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात मंडळ अधिकारी सी. पी. काळगे यांच्या अध्यक्षतेखाली एक खास सभा घेण्यात आली. यावेळी सुप्रिया मालगांवे यांची सरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडी वेळी ग्रामविकास अधिकारी श्रीकांत कोळी, अविनाश ऐनापुरे , सुभाष शहापुरे, सुकुमार किनिंगे, रावसो गणे , नेमिनाथ ऐनापुरे , पुंडलिक कबाडे, जावाहर मरजे, कुमार किनिंगे ग्राम पंचायतीचे सर्व सदस्य सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

संबंधित बातम्या
Back to top button