सांगली : विट्यात विवाहितेची छेड काढल्यावरून दोन गटांत हाणामारी; ३१ जणांवर गुन्हे दाखल | पुढारी

सांगली : विट्यात विवाहितेची छेड काढल्यावरून दोन गटांत हाणामारी; ३१ जणांवर गुन्हे दाखल

विटा; पुढारी वृत्तसेवा : विट्यात विवाहितेची छेड काढल्यावरून दोन गटांत हाणामारी झाली. याबाबत विटा पोलिसांत दोन्ही गटांतील महिलांनी परस्पर विरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत. याप्रकरणी तब्बल ३१ जणांवर विविध गुन्हे दाखल झाले आहेत.

याबाबत विटा पोलिसांनी सांगितले की, संशयित हर्षल निकम याने महिलेचा हात पकडून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

यासह मोटार सायकलीवरून विवाहित महिलेचा पाठलाग केला. ही घटना साधारण १ फ्रेब्रुवारी ते आज अखेरपर्यंत वेळोवेळी घडली. हा प्रकार आपसांत मिटवू म्हणून तिच्या पतीला हर्बल निकम याने नेवरी रस्त्याला बोलावून घेतले. यावेळी निकम याने तिच्या पतीला शिवीगाळ करून लाथाबुक्काने मारहाण केली. तसेच माझ्या पाठीमागे भरपूर मित्र आहेत, तुम्हाला सोडणार नाही अशी पतीस धमकी आणि दमदाटीही केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मा कदम करीत आहेत. तर दुस ऱ्या बाजूच्या फिर्यादीमध्ये एका महिलेने म्हटले आहे की, पत्नीची छेड काढल्याच्या संशयावरून संजय जाधव, राहुल कांबळे, सागर सोनवले, लखन ठोंबरे, नितीन कांबळे, रोहीत भिंगारदेवे, विजय चव्हाण, महेश कांबळे, रोहन कांबळे आणि सागर सकटे यांच्यासह २५ ते ३० लोक (सर्व संशयित रा. विटा) या सर्वांनी २८ जुलै रोजी दुपारी दीड वाजता घरासमोर जावून संबंधित महिला आणि तिच्या पतीला शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी तिच्या चारचाकी (गाडी नं. एम एच ५०,एल. २१९२) चे काठ्यांनी लोखंडी रॉडने नुकसान केले.

तसेच संशयित सागर सोनवले याने संबंधित महिलेचा हात धरून मनास लज्जा होईल अशा प्रकारे वर्तन केले. शिवाय संशयित लखन ठोंबरे याने तिच्या गळ्यातील २० ग्रॅम चे सोन्याचे गंठण हिसडा मारुन तोडून नेले. याबाबत विटा पोलीस स्टेशन ठाण्यामध्ये सर्व संशयित ३० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा;

Back to top button