नांदेड : ट्रकच्या धडकेत सहाय्यक पशुधन अधिकाऱ्याचा मृत्यू | पुढारी

नांदेड : ट्रकच्या धडकेत सहाय्यक पशुधन अधिकाऱ्याचा मृत्यू

उमरी, पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांपूर्वी बद्दली म्हणून गोळेगाव पशुधन केंद्रावर आलेले सहाय्यक पशुधन अधिकारी विनायक काशिनाथ हंडे (वय ५३) यांचा ट्रक अपघातात मृत्यू झाला. पशुधन अधिकारी नागठाणा येथून परत येत असताना कोरेगावच्या दिशेकडून येणाऱ्या सोळा चाकी ट्रकने त्यांना उडवले. दरम्यान वेळेत मदत न मिळाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

महिन्यांपूर्वी गोळेगाव पशुधन केंद्र अंतर्गत बद्दली म्हणून रुजू झालेले सहाय्यक पशुधन अधिकारी विनायक हंडे हे दैनंदिन आपली सेवा करत होते. पशुधन केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावातील पशुधनांना ‘लंपी’ आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्याने ते त्यांच्या कार्याच्या वेळेपेक्षा अधिक वेळ सेवेसाठी देत होते.

सेवेदरम्यान ते नागठाणा (खुर्द) येथील एका शेतकऱ्याच्या गुरांना लंपीची लस देवून कॅनॉल रस्त्यावरून आपल्या दुचाकीद्वारे उमरी -कारेगाव राज्यमार्ग यावर येत होते. त्याचवेळेस कारेगावकडून – उमरीकडे येत असलेल्या भरगाव वेगातील ट्रकने जोरदार धडक दिली. धडक एवढी जोराची होती की,गंभीर अवस्थेतील हंडे यांची परिस्थिती पाहून त्यांच्या मदतीला पंधरा – वीस मिनिटे कोणी आले नाही. शेवटी त्यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.

हेही वाचलंत का?

Back to top button