सांगली: सर्व्हर डाऊनमुळे ग्रामपंचायत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी मुदत वाढ मिळण्याची मागणी | पुढारी

सांगली: सर्व्हर डाऊनमुळे ग्रामपंचायत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी मुदत वाढ मिळण्याची मागणी

जत(सांगली), पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्यात सद्यस्थितीत ८१ ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाइन अर्ज नोंदणी करत असताना सर्व्हर डाऊन असल्यामुळे इच्छुक उमेदवारांना ताटकळत बसावे लागत आहे. संगणकप्रणालीव्दारे नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस (दि.२शुक्रवार) आहे. परंतु उमेदवारांना तांत्रिक अडचणीला सामना करावा लागत आहे. तरी निवडणूक विभागाने नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासाठी व जात वैधता प्रमाणपत्र अर्ज करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता यावे. तसेच दोन दिवसाची मुदतवाढ देण्याची प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी केली आहे.

दरम्‍यान, तहसीलदार यांचे शिफारस पत्र घेणे त्यानंतर ऑनलाईन नोंदणी करत असताना अनेक अडचणी येत आहेत. परिणामी इच्छुक उमेदवार अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्‍यामूळे निवडणूक विभागाने सदरची प्रक्रियेची मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा  

Back to top button