लाचप्रकरणी महिला पोलीस निरीक्षकासह पतीला अटक | पुढारी

लाचप्रकरणी महिला पोलीस निरीक्षकासह पतीला अटक

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मीना बकाल आणि त्यांचे पती कुलभूषण बावस्कर या दोघांना 60 हजार रुपयांच्या लाच प्रकरणी सोमवारी अटक करण्यात आली. ही कारवाई औरंगाबाद  युनिटने केली. या प्रकरणाने जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.

कंधार येथील एका सेतू सुविधा केंद्राच्या तक्रारीची कारवाई टाळण्यासाठी ही लाच घेण्यात आली. तक्राराच्या नातेवाईकाबद्दल या विभागाकडे चौकशी अर्ज प्रलंबित होता. ही कारवाई टाळण्यासाठी उदगीर येथील दोघेजण त्यांच्याकडे गेले आणि हे प्रकरण संपुष्टात आणतो असे म्हणून त्यांच्याकडे एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोड होऊन 70 हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या विभागाने तक्रारीची शहानिशा केल्यानंतर रविवार दि. 20 नोव्हेंबर रोजी सापळा लावला होता.

पहिला हप्ता म्हणून 60 हजार रुपये स्वीकारल्यानंतर सय्यद शकील, सय्यद ईस्माईल या दोघांना अटक करण्यात आली. या दोघांविरुद्ध मुखेड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई औरंगाबादचे पोलीस उपअधीक्षक गोरखनाथ गांगुर्डे आणि पोलीस निरीक्षक रेशमा सौदागर यांच्या पथकाने केली. हे प्रकरण नांदेड जिल्ह्याच्या संबंधित असल्याने त्याचा तपास नांदेड येथील पोलीस निरीक्षक वांद्रे यांच्याकडे देण्यात आला.

पुढील तपासात येथेच कार्यरत असलेल्या महिला पोलीस निरीक्षक मीन बकाल आणि त्यांचे पती कुलभूषण बावस्कर या दोघांना अटक करण्यात आली. न्यायालयाने या दोघांनाही 30 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत देण्यात आली आहे.

हेही वाचा

सांगली : खानापूर तालुक्यात पहिल्या दिवशी सरपंच पदासाठी ७ अर्ज दाखल

औरंगाबाद : ‘बॉयफ्रेंड’वरून तीन विद्यार्थिनींमध्ये फ्रिस्टाइल हाणामारी

अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ रशियात घालणार धुमाकूळ! 8 डिसेंबरला होणार प्रदर्शित 

Back to top button