

खडकी घाट खून प्रकरणात पोलिसांनी १३ वर्षाच्या मुलाचा खून केल्याप्रकरणी त्याचा बाप उमेश वाघमारे याला पाटोदा येथून अटक केली. आपल्या मुलाचा मृतदेह पत्र्याच्या शेडमध्ये पडून असतांना मुलाचा बाप पहाटेच फरार झाला होता. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी त्याचा पाठलाग करत त्याला पाटोदा येथे पकडले. त्यानंतर बापानेच आपल्या मुलाचा खून केल्याचे स्पष्ट झाले.
बीड तालुक्यातील खडकी घाट येथील खोखडोह वस्तीवरील शेतातील एका पत्र्याच्या शेडमध्ये बुधवारी ( दि .१५ ) सकाळी १३ वर्षीय मुलाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आपल्या मुलाचा खून केलेल्या बापाला पकडले.
उमेश वाघमारे असे त्या आरोपीचे नाव असून त्याने तीन विवाह केले आहेत. पहिली पत्नी सोडून गेली, तक दुसरीने आत्महत्या केली होती. तो आता तिसऱ्या बायकोसोबत बीड मध्ये राहत होता. आपल्या पहिल्या पत्नी चा मुलगा आज्जी आजोबा सोबत खडकी घाट येथे राहत असताना जमिनीच्या वादा वरून खून केला असल्याचे माहिती समोर येत आहे
राकेश उमेश वाघमारे ( वय -१३ ) या मुलाचा बुधवारी सकाळी एका पत्र्याच्या शेडमध्ये मृतदेह आढळून आला होता. राकेशचा खून आहे की घातपात हे पोलीस तपासून पाहत होते. त्याचवेळी पोलिसांना त्या मुलाचा बाप पहाटेच गाव सोडून गेल्याची खबर मिळाली. नेकनूर पोलीस अमोल नवले, श्री खांडेकर, श्री.घोलप, डोंगरे, चव्हाण यांनी तपस चक्रे फिरवत आरोपीला पाटोदा येथील पोलिसांच्या मदतीने पकडत बेड्या ठोकल्या.