अखेर वाई-वालूर रस्त्यावरील खड्डे भरणी सुरू | पुढारी

अखेर वाई-वालूर रस्त्यावरील खड्डे भरणी सुरू

चारठाणा; पुढारी वृत्तसेवा : ‘वाई-वालूर रस्त्यावर जीवघेणे खड्डे’ ही बातमी दैनिक पुढारी मध्ये शनिवारी (दि.१२) प्रसिद्ध होताच सेलू सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली. चारठाणा-वाई-वालूर रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम आजपासून सुरू झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांमधून दैनिक पुढारीचे आभार मानले जात आहेत.

चारठाणा-वाई-वालूर हा २० किलोमीटरचा डांबरी रस्ता दोन वर्षांपूर्वी करण्यात आला होता. परंतु संबंधीत गुत्तेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून ते जीवघेणे ठरत आहेत. हा रस्ता ग्रामीण भागासाठी अत्यंत सोयीस्कर आहे. वर्षभरातच रस्ता उखडल्याने वाहनधारकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. हा रस्ता सेलू सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असतानाही संबंधीत विभागाने दुर्लक्ष केले. याबाबतची बातमी ‘दैनिक पुढारीत’ शनिवारी प्रसिद्ध होताच सेलू सार्वजनिक बांधकाम विभागाला खडबडून जाग आली. आजपासून खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर केले जात आहे.

हेही वाचा :

Back to top button