Vastu Tips for Home : मोफत मिळाल्‍या तरी ‘या’ वस्‍तू घरी आणू नका, होईल मोठे नुकसान; काय सांगते वास्‍तुशास्‍त्र | पुढारी

Vastu Tips for Home : मोफत मिळाल्‍या तरी 'या' वस्‍तू घरी आणू नका, होईल मोठे नुकसान; काय सांगते वास्‍तुशास्‍त्र

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : घरात एखादी वस्‍तू संपली असेल तर तुम्‍ही शेजारच्‍यांकडून वस्‍तू आणता. (Vastu Tips for Home ) रोजच्‍या जगण्‍यात आपण एकमेकांना मदत करत असतो. परस्‍पर सहकार्यामुळे आपलं जगणं सुकर होते; पण तुम्‍हाला माहित आहे का? काही गोष्‍टी तुम्‍हाला मोफत मिळाल्‍या तर वास्‍तु दोष निर्माण होतो. मात्र, वास्‍तु शास्‍त्रानुसार, काही अशा गोष्‍टी आहेत त्‍या जर तुम्‍ही मोफत घरी आणल्‍या तर घरात दारिद्र्य येऊ शकते. जाणून घेऊया या गोष्‍टींविषयी…

Vastu Tips for Home : खालील वस्‍तु कधीच मोफत घेवू नका

मीठ : वास्‍तुशास्‍त्रानुसार, मीठ हे कधीच मोफत घेऊ नये. कारण मीठाचा शनिशी संबंध आहे. त्‍यामुळे कधीच मीठ मोफत घेऊ नये. काही कारणास्‍तव तुम्‍हाला मीठ मोफत घ्‍यावयाचे असेल तर तुम्‍ही त्‍या बदल्‍यात दुसरी गोष्‍ट देऊन मीठ घ्‍या;पण मोफत घेऊ नका. यामुळे घरात आजरांना निमंत्रण आणि कर्जबाजारीपणा वाढण्‍याचा धोका असतो.

सुई : वास्‍तुशास्‍त्रानुसार, कधीच मोफत मिळालेल्‍या सुईचा वापर करु नये. मोफत मिळालेली सुई ही वास्‍तुमध्‍ये
नकारात्‍मकता वाढवते. तसेच कुटुंब सदस्‍यांमधील संबंध बिघडू लागतात. तसेच पती-पत्‍नीमधील जीवनावरही नकारात्‍मक परिणाम होतो. आर्थिक दृष्‍ट्या नुकसान होते. त्‍यामुळे तुम्‍ही कधीच मोफत मिळालेली सुई घेऊ नका. तुम्‍ही स्‍वत: विकत घेतलेल्‍या सुईच वापरा.

रुमाल : वास्‍तुशास्‍त्रानुसार, चुकूनही मोफत मिळालेला रुमालचा वापर करु नका. मोफत रुमालमुळे कुटुंबातील नात्‍यांमध्‍ये दुरावा निर्माण होतो. वादविवाद वाढतात. त्‍यामुळे कधीच दुसर्‍याकडून रुमाल घेऊ नका. तसेच आपला रुमालही कोणाला देऊ नका. मोफत मिळाला रुमाल हा आर्थिकदृष्‍ट्या नुकसान देणारा असतो.

लोखंड आणि तेल : लोखंड आणि तेल हे शनि देवाशी संबंधित आहे. त्‍यामुळे वास्‍तुशास्‍त्र सांगते की, तेल आणि लोखंड मोफत मिळाले तर त्‍याचा तुमच्‍या जीवनावर प्रतिकूल परिणाम होतो. दान केलेले लोखंड आणि ते हे घरात दारिदृ्य आणते. तसेच मागून तेल आणले असेल तर आर्थिकदृष्‍ट्या नुकसान होते. त्‍यामुळे कधीच मोफत मिळालेले लोखंड आणि तेल याचा वापर करू नका.

( वरील माहिती वास्‍तुतज्ज्ञांनी सांगितली असून श्रद्धेवर आधारित आहे. पुढारी ऑनलाईन त्‍याची हमी देत नाही. )

हेही वाचा : 

 

Back to top button